नवी दिल्ली/प्रतिनिधी
देशातील कोरोना संसर्गाच वेग काहीसा मंदावला आहे, तरी देखील अद्यापही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. मागील २४ तासात ४६ हजार ६१७ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ५९ हजार ३८४ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत.
दरम्यान देशातील एकूण बाधितांची संख्या ३,०४,५८,२५१ वर पोहोचली असून असून, आजपर्यंत २,९५,४८,३०२ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या ५,०९,६३७ इतकी आहे. तर, आजपर्यंत ४,००,३१२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय आजपर्यंत ३४,००,७६,२३२ जणांचे लसीकरण झाले आहे.