नरंदे / प्रतिनिधी
नरंदे तालुका हातकणंगले येथील देशमुख इंग्लिश मीडियम स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून जयसिंगपूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष स्वरूपाताई पाटील आणि दलित मित्र वसंतराव यादव, समता शिक्षण संस्था तासगाव चे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागनाथ एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक प्रतापराव देशमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने झाली. कार्यक्रमांमध्ये कोळी गीत, गोंधळ गीत, देशभक्तीपर गीत , शेतकरी गीत, तसेच राजमाता जिजाऊ यांच्यावर गीत यावर बहारदार नृत्य सादर करण्यात आले. तसेच वाढती वृद्धाश्रमांची संख्या, स्त्रीभ्रूणहत्या, शेतकरी आत्महत्या, मोबाईलचे दुष्परिणाम यांसारख्या सामाजिक विषयावर उत्कृष्ट नाटिका सादर करण्यात आल्या. तसेच ‘लग्नाची थीम’ या कार्यक्रमात लग्नातील सर्व विधी प्रेक्षकांसमोर सादर करून प्रेक्षकांना भारावून सोडले. तसेच सर्व मुलांनी उत्कृष्टपणे कार्यक्रमाचे सादरीकरण करत पालक व ग्रामस्थांची मने जिंकली.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत चव्हाण मॅडम यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागनाथ एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी नमिता देशमुख यांनी केले. यावेळी पोलिसांना खुनाच्या गुन्ह्यातील सहकार्याबद्दल नरंदे गावचे पोलीस पाटील वैभव भंडारी यांचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चव्हाण मॅडम व कांबळे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सौ. खर्डेकर मॅडम यांनी केले.
यावेळी नरंदे हायस्कूल नरंदे च्या अध्यक्ष सौ. शोभाताई देशमुख, नागनाथ एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी हर्षवर्धन देशमुख, नागनाथ एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी नमिता देशमुख, नरंदे चे सरपंच रवींद्र अनुसे, उपसरपंच अभिजित भंडारी, हातकणंगले पंचायत समितीचे उपसभापती राजकुमार भोसले, ग्रामपंचायत सदस्य संतोष भंडारी, नामदेव पाटील, लक्ष्मीबाई खोत, विश्वास भंडारी, स्वप्निल भंडारी, कपिल भंडारी, निवासी शिक्षण संकुलाचे विजयसिंह देसाई, नरंदे हायस्कूल नरंदे चे मुख्याध्यापक ए. एम. मुजावर यांची उपस्थिती होती.