सेन्सेक्स 479.68 अंकांनी तर निफ्टी 170.55 अंकांनी वधारला
प्रतिनिधी/ मुंबई
सोमवारप्रमाणेच मंगळवारी शेअर बाजारात चड-उताराची स्थिती होती, पण या वेळी शेअर बाजार वधाराच्या स्थरावर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये मंगळवारी सुरुवातीच्या व्यापारात 500 अंकांनी वधारला. त्याचबरोबर जगभरातील शेअर बाजारात तेजी दिसून आली. बाजारात सकाळपासूनच अनेक चढ-उतार दिसून आले आणि शेवटी सेन्सेक्स 479.68 अंकांनी वधारून 38,623.70 च्या स्थरावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 170.55 अंकांनी वधारत 11,303.30 अंकांच्या स्थरावर बंद झाला