मुंबई : देशातील भारतीय अर्थव्यवस्था आता काही प्रमाणात सुधारत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये या अगोदर निश्चित केलेला जीडीपी काही प्रमाणात सुधारुन मजबूत राहणार असून चालू आर्थिक वर्षात जीडीपी 0 ते 7.4 टक्क्यांच्या खाली राहणार असल्याचा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) अहवालात नोंदवला आहे. या अंदाजामुळे भारतीय अर्थव्यवस्था कोरोना काळात घसरणीत होती, ती सध्या बदलत आणि सुधारत असल्याची माहिती आहे.
सदरचा अंदाज व्यक्त करण्याअगोदर याआधी मांडलेल्या अहवालात चालू आर्थिक वर्षात जीडीपी 0 ते 10.9 ने घसरणीत राहणार असल्याचे एसबीआयने स्पष्ट केले होते. एसबीआयने हा नवीन अंदाज मांडण्यासाठी जवळपास नाउकास्टिंग मॉडेलचा आधार घेतला आहे. यामध्ये उद्योग, सेवा, ग्लोबल अर्थव्यवस्थेसह अन्य 41 हाय फ्रिक्वेंसीच्या उलाढालीचा अंदाज घेत हा अहवाल मांडण्यात आल्याचे एसबीआयने स्पष्ट केले आहे.