कोरोनाच्या प्रभावानंतर उद्योग क्षेत्र सावरतंय- विविध क्षेत्रांच्या कामगिरीत सुधारणात्मकतेचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना कालावधीच्या संकटामधून काहेशा प्रमाणात सावरत आता उद्योग विभागातील सर्व क्षेत्र सावरत असल्याचे दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणून सलग तिसऱया महिन्यांमध्ये देशाची निर्यात वाढली आहे. फेब्रुवारी महिन्यात देशाची निर्यात वर्षाच्या आधारे 0.67 टक्क्यांनी वाढीसोबत 27.93 अब्ज डॉलवर राहिला आहे.
यामध्ये आयात मात्र 6.96 टक्क्यांच्या वाढीसह 40.54 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. अधिकच्या माहितीनुसार व्यापारी तोटा वाढून 12.62 अब्ज डॉलर झाल्याची माहिती आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये हा आकडा 10.16 अब्ज डॉलरवर स्थिरावल्याची नोंद आहे.
कच्च्या तेलाच्या आयातीत घसरण
एप्रिल ते फेब्रुवारी 2020-21 च्या दरम्यान कच्च्या तेलाच्या निर्यातीत 12.23 टक्क्यांची घसरण येऊन 256.18 अब्ज डॉलवर पोहोचला आहे. एक वर्षाच्या अगोदर समान कालावधीत हा आकडा 291.87 अब्जवर राहिला होता. आयात एप्रिल ते फेब्रुवारीत 23.11 टक्क्यांनी घटून 340.8 अब्ज डॉलरवर राहिला आहे.
सोने आयात मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट
फेब्रुवारीमध्ये तेलाची आयात 16.63 टक्क्यांच्या घसरणीसह 8.99 अब्ज डॉलवर राहिली. तर एप्रिल ते फेब्रुवारीच्या दरम्यान शिपमेंट 40.18 टक्क्यांच्या घसरणीसह 72.08 अब्ज डॉलवर राहिले आहे. फेबुवारीत सोने आयात वाढीसोबत 5.3 अब्जवर राहिले जी एक वर्षाअगोदर समान कालावधीत 2.36 अब्ज डॉलवर राहिल्याची नोंद आहे.
तांदूळ निर्यातीत 30 टक्क्यांची वाढ
फेबुवारीच्या दरम्यान ऑईलमील, आयरन ऑर आणि तांदूळाची निर्यात ही सर्वाधिक वाढली आहे. साधारण ही वाढ 30.78 टक्क्यांनी मजबूत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. तसेच दुसरीकडे कार्पेट क्षेत्रात 19.46 टक्के, मसाल्यात 18.61, फामॉस्युटिकल्समध्ये 14.74 टक्के तंबाखु 7.71 आणि केमिकल्स क्षेत्रात 1.2 टक्क्यांची वाढ राहिली आहे.