राधानगरी तालुका आजी माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशनचे उद्घाटन
राधानगरी / प्रतिनिधी
देशाच्या संरक्षणासाठी काम केलेल्या सैनिकांबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड आदर आहे. निवृत्ती नंतर माजी सैनिकांच्या संघटनेने आपत्ती निवारण कामात मदत करण्याची घेतलेली भूमिका त्यांच्याबद्दलचा आदर वाढवणारी असल्याचं प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलं ते असोसिएशनच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
राधानगरी तालुका आजी माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशनचे उदघाटन राधानगरी इथल्या अंबाबाई सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत सम्पन्न झालं.यावेळी आमदार प्रकाश अबीटकर यांनी निवृत्तीनंतरही माजी सैनिकांनी सुरू ठेवलेल्या सामाजिक कामांचा गौरव केला.यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष कॅप्टन तानाजी खाडे यांनी राधानगरी तालुक्यातील अजि माजी सैनिकांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ही संघटना स्थापन केली असली तरी राधानगरी तालुक्यावर येणाऱ्या नैसर्गिक आणि अन्य आपत्ती काळात सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीसाठी असोसिएशन सदैव तत्पर राहणार असल्याच सांगितले.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले माजी सैनिक आणि नवीन निवृत्त झालेल्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला.तहसीलदार मीना निंबाळकर,पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी,सरपंच कविता शेट्टी,अमित पाटील,मार्केटिंग फेडरेशन नंदकिशोर सूर्यवंशी,पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, कॅप्टन अशोक सावेकर यांची भाषणे झाली. गटविकास अधिकारी संदीप भंडरी, अनिल बडदारे, अनिल पाटील, कॅप्टन अनील देसाई, प्रकाश भालेकर,मंडल अधिकारी सुंदर जाधव, अनिल संकपाळ, उपाध्यक्ष पिराजी भोसले, सचिव संभाजी पाटील यांच्यासह आजी माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.