ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात 46 हजार 148 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 979 रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे मृतांचा हा आकडा मागील 76 दिवसातील सर्वात कमी आहे. दरम्यान, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 कोटी 02 लाख 79 हजार 331 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 3 लाख 96 हजार 730 एवढी आहे.
रविवारी 58 हजार 578 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 2 कोटी 93 लाख 09 हजार 607 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 5 लाख 72 हजार 994 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.