नवी दिल्ली : देशातील खनिज उत्पादनामध्ये चालू वर्षात जूनमध्ये वर्षाच्या आधारे 23.1 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती उपलब्ध आकडेवारीमधून देण्यात आली आहे. खाण मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार खाण आणि उत्खनन क्षेत्रातील खनिज उत्पादनाचा निर्देशांक जून 2021 मध्ये 105.5 वर राहिला आहे. हा आकडा जून 2020च्या तुलनेत 23.1 टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती आहे. जून 2021 मध्ये महत्वपूर्ण खनिज उत्पादनांत पुढील घटकांचा समावेश आहे. यामध्ये कोळसा उत्पादन 510 लाख टन, लिग्नाइट 34 लाख टन, नैसर्गिक गॅस 271.4 कोटी घनमीटर, पेट्रोलियम(कच्चे तेल)25 लाख टन, बॉक्साइट 1739 हजार टन, क्रोमाइट 322 हजार टन आणि मॅगनीज 208 टनवर राहिल्याची माहिती देण्यात आली आहे.
Previous Articleशाळेचे छत कोसळून 27 मुले जखमी
Next Article व्यापाऱयांचा सोयाबिनवर दरोडा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.