मारुती कंपनीच्या सात कार्सचा समावेश : स्विफ्ट कारची लोकप्रियता कायम, राखले पहिले स्थान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑटोमोबाईल कंपन्यांनी फेब्रुवारीतील वाहन विक्रीची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सर्वाधिक विक्री होणाऱया पहिल्या 10 कार्सचा समावेश असून मारुती स्विफ्टने यादीत बाजी मारली आहे. यापाठोपाठ डिझायर, वॅगनारचा नंबर लागतो. यातील काही प्रमुख कार्स खालील प्रमाणे
1. मारुती स्विफ्ट ः फेब्रुवारी 2022 मध्ये कंपनीच्या स्विफ्ट गाडीची 19,202 युनिट विक्री झाली असून विक्रीत पहिला नंबर पटकावण्यात यशस्वी ठरली आहे.
2. मारुती डिझायर ः यापाठोपाठ कॉम्पॅक्ट सेडान डिझायरचा नंबर लागत असून मागील फेब्रुवारीच्या तुलनेत 46.52 टक्के जादा विक्री करत विक्रीत दुसरे स्थान मिळवले आहे.
3.मारुती वॅग्नाआर ः या मॉडेलची फेब्रुवारी 2022 मध्ये 14,669 इतकी विक्री झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा आकडा 21.67 टक्क्यांनी कमी झाला असून काहीप्रमाणात सावरत आपले स्थान टिकवण्याचा प्रयत्न केला आहे.
4.मारुती बलेनो ः या गाडीचे नवीन मॉडेल सादर करण्यात आले असून ग्राहकांसाठी त्याची प्रतीक्षा होती. मात्र फेबुवारीत ही विक्री कमी राहिल्याची नोंद आहे. लाँचिंगनंतर जवळपास 25,000 वाहनांना बुकिंग मिळाले आहे.
5.टाटा नेक्सन ः टाटा मोर्ट्सने नेक्सन एसयूव्ही पाचव्या नंबरवर राहिली असून जवळपास दोन पट विक्रीसोबत एसयूव्हीने पहिल्या पाचमध्ये स्थान पटकावण्यात यश मिळवले आहे.
6.आर्टिगा ः हे मॉडेल सहाव्या क्रमांकावर राहिले असून फेब्रुवारी 2022 मध्ये 11,649 मॉडेलची विक्री राहिली आहे. मागील फेब्रुवारीच्या तुलनेत हा आकडा 19.18 टक्के अधिक राहिला आहे.
7.आल्टो ः ही मारुती सुझुकीची लहान कार प्रसिद्धीपासून लांब राहते आहे. जी मिनी सेगमेंटमध्ये लोकप्रिय दिसून आली आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत विक्री 31 टक्क्यांनी कमी झाल्याची नेंद आहे.
8.हय़ुंदाई वेन्यू ः मागील काही कालावधीत या मॉडेलची विक्री कमी झाली आहे. परंतु मागील महिन्यात ही विक्री मजबूत राहिली आहे.
9.सेलेरियो ः नवीन मॉडेलमध्ये सादर करण्यात आलेल्या सेलेरियोला अधिकची पसंती मिळत असून विक्री वाढत राहिली आहे. यात फेबुवारी 2022 मध्ये 9,896 वाहनांची विक्री राहिली आहे.
10.हय़ुंदाई क्रेटा ः या एसयूव्हीची विक्री सलग कमी होत राहिली असून हिने पहिल्या दहामध्ये स्थान प्राप्त केले आहे.