ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 2 दिवसांपासून 40 हजारांच्या आत असलेल्या बाधितांच्या दैनंदिन संख्येत शनिवारी वाढ झाली. मागील 24 तासात 41 हजार 157 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 518 रुग्णांचा मृत्यू झाला.
शनिवारी 42 हजार 004 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 3 कोटी 02 लाख 69 हजार 796 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 4 लाख 22 हजार 660 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 40 कोटी 49 लाख 31 हजार 715 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.