मागील महिन्यातील आकडेवारी : व्यापार घटून 3.15 अब्ज डॉलरवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील मे महिन्यातील निर्यात 36.47 टक्क्मयांनी घसरुन 19.05 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. पेट्रोलियम, टेक्स्टाईल्स, इंजिनिअरिंग, रत्न आणि दागिने या क्षेत्रात प्रामुख्याने घसरण झाली आहे. देशाची निर्यात सलग तिसऱया महिन्यात घसरली आहे.
देशातील आयात मे महिन्यात 51 टक्क्मयांनी घटून 22.2 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. आयात आणि निर्यात या दोन्ही क्षेत्रात घसरण झाली असून मागील महिन्यात देशातील व्यापारात घट होत 3.15 अब्ज डॉलरवर राहिली आहे. मागील वर्षात समान कालावधीत व्यापारातील तोटा हा 15.36 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.
एप्रिल मेमधील निर्यात
चालू व्यापारी वर्षात पहिल्या दोन महिन्यात (एप्रिल-मे) देशाची निर्यात 47.54 टक्क्मयांनी घसरुन 29.41 अब्ज डॉलरवर राहिली. याच दरम्यान आयात 5.67 टक्क्मयांनी घसरुन 39.32 अब्ज डॉलरच्या घरात राहिली. दोन्ही महिन्यात देशाचा व्यापार हा मात्र 9.91 अब्जावर स्थिरावला आहे. तेल आयात मागील महिन्यात 71.98 टक्क्मयांनी घसरली होती. सोने आयात ही मे मध्ये 98.4 टक्मक्मयांनी घसरुन 7.631 कोटींवर राहिली आहे.