मुंबई
देशातील मक्क्याची निर्यात चालू आर्थिक वर्षात पहिल्या 10 महिन्यात एप्रिल ते जानेवारी दरम्यान 28 टक्के इतकी वाढीव राहिली आहे. पहिल्या 10 महिन्यात मक्क्याची निर्यात ही 81.63 कोटी डॉलर्सची झाली आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत निर्यात 63.48 कोटी डॉलर्सची झाली होती. बांगलादेश व नेपाळ हे देश भारताकडून मोठय़ा प्रमाणात मक्क्याची खरेदी करतात. बांगलादेशने 34.55 कोटी डॉलर्सचा मक्का आयात केला आहे तर नेपाळने 13.21 कोटी डॉलर्सचा मक्का आयात केला आहे.