बेंगळूर/प्रतिनिधी
वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने जुन्या वाहनांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने वाहन भंगार धोरण जाहीर केलं आहे. धोरण जाहीर केल्याच्या काही दिवसानंतर कर्नाटकात सर्वात जास्तम्हणजे ७० लाख जुनी वाहने रस्त्यावर असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यापैकी ३१.९ लाख वाहने १५ ते २० वर्षे आणि ३८.१ लाख वाहने २० वर्षांवरील आहेत.
दरम्यान केंद्र सरकारने १५ वर्षांवरील जुनी व्यावसायिक वाहने आणि २० वर्षांवरील जुनी खासगी वाहने यांची नोंदणी रद्द करण्यात येईल. याचबरोबर केंद्र, राज्य सरकारे, महापालिका, पंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी कंपन्या आणि केंद्रशासित प्रदेशातील स्वायत्त संस्थांच्या मालकीच्या१ ५ वर्षांवरील वाहनांची नोंदणीही रद्द करण्यात येईल, असे लोकसभेत सादर केलेल्या नवीन विधेयकात म्हंटले आहे.