ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्येत घट होत असल्याने देशातील पॉझिटिव्हिटी दर देखील कमी झाला आहे. देशात गेल्या 71 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्येवर उपचार सुरू असल्याचे समोर आले आहे. देशात सध्या 8 लाख 26 हजार 740 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गुरुवारी आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतात मागील 24 तासात 67 हजार 208 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 2 कोटी 97 लाख 00 हजार 313 वर पोहचली आहे. बुधवारी 2,330 रुग्णांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत 3,81,903 जणांनी आपला जीव गमावला आहे.
- आतापर्यंत 26.55 कोटी नागरीकांचे लसीकरण पूर्ण
कालच्या दिवशी 1 लाख 03 हजार 570 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 2 कोटी 84 लाख 91 हजार 670 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत देशातील 26 कोटी 55 लाख 19 हजार 251 जणांना लस देण्यात आली आहे.
आतापर्यंत देशात 38 कोटी 52 लाख 38 हजार 220 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 19 लाख 31 हजार 249 कोरोना चाचण्या बुधवारी (दि. 16 जून 2021) एका दिवसात करण्यात आल्या.