नवी दिल्ली
मुंबई-अहमदाबादरम्यान बुलेट ट्रेन सेवा सुरू होण्यास अद्याप मोठा कालावधी असला तरीही रेल्वेने नव्या मार्गांची तयारी सुरू केली आहे. दिल्ली-वाराणसी तसेच दिल्ली-अमृतसर समवेत 6 नव्या हायस्पीड कॉरिडॉर्सची निवड करण्यात आली आहे. वर्षभरात या मार्गांकरता विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे.
नव्या हायस्पीड कॉरिडॉर्समध्ये 865 किलोमीटर लांबीचा दिल्ली-वाराणसी तसेच 459 किलोमीटर लांबीचा दिल्ली-अमृतसर मार्गाचा समावेश आहे. तसेच 886 किलोमीटर लांबीचा दिल्ली-अहमदाबाद, 753 किलोमीटर लांबीचा मुंबई-नाशिक-नागपूर, 711 किलोमीटर अंतराचा मुंबई-हैदराबाद तसेच चेन्नई-म्हैसूर मार्गांवर बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता असल्याची माहिती रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद यादव यांनी दिली आहे.