ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 15 हजार 510 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 106 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 10 लाख 96 हजार 731 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 57 हजार 157 एवढी आहे. देशात आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 1 कोटी 43 लाख 01 हजार 266 लोकांना लस देण्यात आली आहे.
रविवारी 11,288 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 07 लाख 86 हजार 457 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 1 लाख 68 हजार 627 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
देशात आतापर्यंत 21 कोटी 68 लाख 58 हजार 774 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 06 लाख 27 हजार 668 कोरोना चाचण्या रविवारी (दि.28) करण्यात आल्या.