नवी दिल्ली
इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप ‘ईबाईकगो’ येत्या काळात देशातील पाच शहरांमध्ये जवळपास 3,000 स्मार्ट चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची योजना आखत आहे. सदरची चार्जिंग स्टेशन्स आयओटीच्या तंत्रज्ञानावर आधारीत राहणार आहेत. याचा वापर हा दुचाकी वाहन चार्ज करण्यासाठी होणार असल्याची माहिती स्टार्टअपने दिली आहे.
कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यामध्ये तब्बल 3000 चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. सदरची ही स्टेशन्स दिल्ली-एनसीआर, मुंबई, बेंगळूर, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये उभारण्यात येणार असून येत्या तीन महिन्यात त्यांची उभारणी होईल. तसेच कंपनी संपूर्ण देशात 1 वर्षामध्ये 12 ते 15 हजार चार्जिंग स्टेशन्स सुरू करण्याचे संकेत आहेत.
ऍपच्या मदतीने देखरेख
सदर चार्जिंग स्टेशन्सवर देखरेख करण्यासाठी ‘ईबाईकगो’ चार्ज ऍप लाँच करणार आहे.