ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात 40 हजार 953 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यंदाच्या वर्षातील कोरोनाची ही उच्चांकी रुग्णवाढ आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 15 लाख 55 हजार 284 वर पोहचली आहे. शुक्रवारी 188 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 59 हजार 558 एवढी आहे. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 4 कोटी 20 लाख 63 हजार 392 जणांना लसीकरण करण्यात आले आहे.
शुक्रवारी 23,653 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 11 लाख 07 हजार 332 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 2 लाख 88 हजार 394 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
देशात आतापर्यंत 23 कोटी 24 लाख 31 हजार 517 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 10 लाख 60 हजार 971 कोरोना चाचण्या शुक्रवारी (दि.19) करण्यात आल्या.