ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना रुग्णांची संख्या काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. दिवसेंदिवस दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील 24 तासात 42 हजार 982 नवे रुग्ण आढळून आले. तर 533 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 3 कोटी 18 लाख 12 हजार 114 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 4,26,290 जणांनी आपला जीव गमावला आहे.
बुधवारी देशात 41 हजार 726 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 3 कोटी 09 लाख 74 हजार 748 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात 4 लाख 11 हजार 071 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आतापर्यंत देशातील 48 कोटी 93 लाख 42 हजार 295 जणांना लस देण्यात आली आहे.
आतापर्यंत देशात 47 कोटी 48 लाख 93 हजार 363 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 16 लाख 64 हजार 030 कोरोना चाचण्या बुधवारी (दि. 4 ऑगस्ट 2021) एका दिवसात करण्यात आल्या.