ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत मागील आठवड्यापासून काहीशी वाढ पहायला मिळत आहे. शनिवारी देशात 41 हजार 786 नव्या संक्रमितांची नोंद झाली. 39 हजार 304 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर 542 रुग्ण दगावले.
देशात आतापर्यंत 3.16 कोटी लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 3.8 कोटी रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सद्यस्थितीत देशात 4 लाख 04 हजार 804 उपचारार्थ रुग्ण आहेत. तर 4 .24 लाख रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
केरळमध्ये सक्रिय रुग्णसंख्येचा आकडा 1.64 लाखांवर
केरळमध्ये मागील पाच दिवसांपासून दररोज 20 हजारहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. शनिवारी 20 हजार 624 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 80 रुग्णांचा मृत्यू झाला. केरळमध्ये सध्या 1 लाख 64 हजार 500 सक्रिय रुग्ण आहेत.