ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात 3604 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 70 हजार 756 वर पोहचली आहे.
देशात आतापर्यंत 22 हजार 454 कोरोना रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. तर 46 हजार 008 रूग्णांवर उपचार सुरू असून, 2293 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात येत नसल्याने रेड झोन आणि कंटेन्मेंट झोनमधील निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. देशातील मृत्युदर सध्या 4% आहे तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 31.15 टक्के आहे.