ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील काही दिवसांपासून उच्चांक नोंदवणाऱ्या दैनंदिन रुग्णसंख्येत सोमवारी थोडा दिलासा मिळाला असून, कोरोनामुक्तीचा वेग वाढला आहे. सोमवारी दिवसभरात 2 लाख 51 हजार 827 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
दरम्यान, मागील 24 तासात देशात 3 लाख 23 हजार 144 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 2771 रुग्णांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत 1 कोटी 76 लाख 36 हजार 307 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 1 लाख 97 हजार 894 रुग्ण दगावले असून, सध्या 28 लाख 82 हजार 204 रुग्ण उपचार घेत आहेत.
देशात आतापर्यंत 14 कोटी 52 लाख 71 हजार 186 लोकांना लसीकरण करण्यात आले आहे.