ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात शनिवारी 9120 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. भारतात आतापर्यंत 4 लाख 10 हजार 461 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 2 लाख 27 हजार 756 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर आता 54.13 टक्क्यांवर आला आहे.
देशात सध्या 1 लाख 69 हजार 451 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर गेल्या 24 तासात 1 लाख 89 हजार 889 जणांचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत 66 लाख 16 हजार 496 नमुने तपासण्यात आले आहेत.
कोरोना चाचण्यांसाठी 715 शासकीय तर 269 खासगी प्रयोगशाळांची संख्या वाढली आहे. यात 350 शासकीय तर खासगी 193 अशा 543 प्रयोगशाळांमध्ये जलद आरटी पीसीआर आधारित चाचण्यांची सुविधा आहे. 75 प्रयोगशाळांमध्ये सीबीएनएएटी आधारित चाचण्यांची सुविधा आहे.