441 जणांचा मृत्यू : सक्रिय रुग्णसंख्या 18 लाख 31 हजारांवर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात गेल्या 24 तासात 2 लाख 82 हजार 970 नवे रुग्ण आढळले असून 441 मृत्यूंची नोंद झाली आहे. याचदरम्यान एकाच दिवसात 1 लाख 88 हजार 157 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यापूर्वी देशात मंगळवारी 24 तासात देशात 2 लाख 38 हजार 18 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.
देशात सध्या 18 लाख 31 हजार रुग्ण सक्रीय असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिली. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊन हा आकडा 3 कोटी 79 लाख 1 हजार 241 वर पोहोचला आहे. तसेच ओमिक्रॉनबाधितांचा आकडा 8 हजार 961 वर गेला आहे. आतापर्यंत देशात 4 लाख 87 हजार 202 इतक्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची आकडेवारी आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आली आहे.