एकूण बाधित 70 लाखांच्या पुढे : मृतांचा आकडा 1 लाख 8 हजारांवर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
एकीकडे केंद्र सरकार अनलॉकची प्रक्रिया वेगाने राबवत असताना दुसरीकडे देशात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या दररोज वाढत आहे. कोरोनाच्या नव्या प्रकरणात थोडा दिलासा मिळाला असला तरी मागील 24 तासांत आलेल्या नव्या 74 हजार 383 रुग्णांनंतर देशात कोरोना संक्रमित एकूण रुग्णांची संख्या 70 लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडय़ांनुसार, मागील 24 तासात 918 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात एकूण 70 लाख 53 हजार 806 रुग्ण सापडले आहेत. यापैकी 1 लाख 8 हजार 334 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात अजूनही 8 लाख 67 हजार 496 इतके सक्रिय रुग्ण असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. देशात आतापर्यंत 60 लाख 77 हजार 976 लोक बरे झाले आहेत. रविवारी सकाळपर्यंतच्या अखेरच्या चोवीस तासात 89 हजार 154 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील 24 तासात 10 लाख 78 हजार 544 कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत