@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात बुधवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात 11 हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मात्र, डिस्चार्ज मिळणाऱयांची संख्या वाढल्यामुळे सक्रिय रुग्णांमध्ये आणखी घट झाली आहे. गेल्या 24 तासात 14 हजार 225 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
देशात आतापर्यंत 1 कोटी 7 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 11 हजार 39 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच देशात 110 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशभरात 1 लाख 60 हजार 57 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात एकूण 1 लाख 54 हजार 596 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा आता 1 कोटी 7 लाख 77 हजार 284 वर पोहोचल्याची माहिती बुधवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आली. देशात आतापर्यंत 1 कोटी 4 लाख 62 हजार 631 रुग्ण उपचाराअंती बरेही झाले आहेत.