नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात बुधवारी कोरोनाच्या 6,984 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 247 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 8,168 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील 6 हजार 984 दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये 3 हजार 377 रुग्ण फक्त केरळातीलच आहेत. दरम्यान, देशात आतापर्यंत 60 हून अधिक जणांना नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटची बाधा झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये बुधवारी पहिला रुग्ण सापडला असून तो अबुधाबी येथून मायदेशी दाखल झाला होता.
देशात सध्या 87 हजार 562 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत देशात 3 कोटी 41 लाख 46 हजार 931 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत देशात 4 लाख 76 हजार 135 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचे 134 कोटी 61 लाख 14 हजार 483 डोस देण्यात आले आहेत.