ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील लोकांना सर्व स्तरातील माहिती देण्याचे आणि मार्गदर्शन करण्याची ताकद मीडियात आहे. त्यामुळे मीडियाला देशात पूर्ण स्वातंत्र्य आहे. देशातील पत्रकारांच्या स्वातंत्र्याबद्दल दुय्यम प्रतिमा तयार करण्याऱ्या सर्वेक्षणाचा आम्ही लवकरच पोलखोल करू, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे.
ग्लोबल प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारत दोन स्थानांवर घसरला आहे. स्वतंत्र पत्रकारितेची बाजू मांडणाऱ्या रिपोर्टर विथ बॉर्डर या संस्थेने यंदा जाहीर केलेल्या वार्षिक विश्लेषणामध्ये 180 देशांपैकी 142 व्या क्रमांकावर भारत आहे.