ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात आतापर्यंत 2 कोटी 75 लाख 55 हजार 457 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 48 लाख 93 हजार 410 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, सध्या 23 लाख 43 हजार 152 रुग्ण उपचार घेत आहेत.
दरम्यान, देशात गुरुवारी 1 लाख 86 हजार 364 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 2 लाख 59 हजार 459 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 3660 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 3 लाख 18 हजार 895 एवढी आहे. आतापर्यंत 20 कोटी 57 लाख 20 हजार 660 जणांना लस देण्यात आली आहे.