ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात 6 हजार 566 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 194 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1 लाख 58 हजार 333 वर पोहचली असून, मृतांची संख्या 4 हजार 531 एवढी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या देशात 86 हजार 110 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 67 हजार 692 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशातील कोरोना रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. रुग्ण वाढण्याचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. तर एकूण रुग्णांपैकी मृत्यू होण्याचे प्रमाण एकट्या महाराष्ट्रात 50 टक्के आहे.
त्यातच दिलासा देणारी बाब म्हणजे आता च्या घडीला देशात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 42.4 टक्के आहे. मुख्य म्हणजे योग्य ती काळजी, प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास कोरोना पासून किमान दूर राहणे शक्य आहे. याबरोबरच सोशल डिस्टन्सिंग चे पालन केल्यास कोरोनावर आपण वेगाने मात करणं शक्य होईल.