ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातून कोरोना रुग्ण संख्येबाबत दिलासा देणारी बाब समोर आली आहे. मागील 24 तासात नव्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. गुरुवारी आरोग्य विभागाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार देशात 36 हजार 401 नवे रुग्ण आढळून आले. कालच्या दिवशी 530 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 3 कोटी 23 लाखांवर पोहचली असून आतापर्यंत 4,33,049 जणांनी आपला जीव गमावला आहे.
बुधवारी देशात 39 हजार 157 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 3 कोटी 15 लाख 25 हजार 080 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात 3 लाख 64 हजार 129 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मागील 149 दिवसातील ही सर्वात कमी रुग्ण संख्या आहे. दरम्यान, काळ एका दिवसात 56,36,336 जणांना लसीचे डोस दिले. तर आतापर्यंत देशातील 56 कोटी 64 लाख 88 हजार 433 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. दरम्यान, सध्या देशातील रिकव्हरी दर 97.53 टक्क्यांवर आहे. तर पॉझिटिव्हिटी रेट 1.94 टक्के इतका आहे.
- 50.3 कोटी कोरोना चाचण्या पूर्ण
भारतीय आयुर्वेदिक अनुसंधान परिषद (ICMR) कडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात 50 कोटी 03 लाख 00 हजार 840 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 18 लाख 73 हजार 757 कोरोना चाचण्या बुधवारी (दि. 18 ऑगस्ट 2021) एका दिवसात करण्यात आल्या.