ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात अजूनही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव दिसून येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी देशात कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. मागील 24 तासात देशात 1 लाख 34 हजार 154 नवे रुग्ण आढळून आले. सोमवारी ही संख्या 1,32,788 इतकी होती. तर कालच्या दिवसात 2,887 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 2 कोटी 84 लाख 41 हजार 986 वर पोहचली आहे.
देशात दुसऱ्या लाटेत कोरोना संकट हे अधिक गडद होताना दिसत आहे. बुधवारी देशात 2 लाख 11 हजार 499 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 2 कोटी 63 लाख 90 हजार 584 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून सद्य स्थितीत हा दर 92.79 % इतका आहे.
सध्या देशात 24 लाख 17 लाख 13 हजार 413 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशात मृतांची एकूण संख्या 3 लाख 37 हजार 989 एवढी आहे. दरम्यान आतापर्यंत देशातील 22 कोटी 10 लाख 43 हजार 693 जणांना लस देण्यात आली आहे.
आतापर्यंत देशात 35 कोटी 37 लाख 82 हजार 648 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 21 लाख 59 हजार 873 कोरोना चाचण्या बुधवारी (दि. 2 जून 2021) एका दिवसात करण्यात आल्या.