ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात रविवारी मागील साडेपाच महिन्यातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. मागील 24 तासात देशात 68 हजार 020 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 291 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 20 लाख 39 हजार 644 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 61 हजार 843 एवढी आहे.
रविवारी 32,231 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 13 लाख 55 हजार 993 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 5 लाख 21 हजार 808 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 6 कोटी 05 लाख 30 हजार 435 जणांना लसीकरण करण्यात आले.
देशात आतापर्यंत 24 कोटी 18 लाख 64 हजार 161 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 09 लाख 13 हजार 319 कोरोना चाचण्या रविवारी (दि.29) करण्यात आल्या.