ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात कोरोना लसीकरणाला वेग आला असून, आतापर्यंत 2.26 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, पहिल्या टप्प्यात 70 लाख 41 हजार 584 आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिली तर 37 लाख 12 हजार 906 आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरीही लस घेतली आहे. 67 लाख 73 हजार 081 फ्रंटलाईन वर्कर्सने पहिली तर 3 लाख 13 हजार 835 फ्रंटलाईन वर्कर्सने दुसरी लस घेतली आहे.
दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षावरील 6 लाख 58 हजार 918 लोकांनी लस घेतली आहे. सोमवारी 16 लाख 96 हजार 588 लोकांना लस देण्यात आली.