ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात यंदाच्या वर्षातील कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या गुरुवारी आढळून आली. मागील 24 तासात 39 हजार 726 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 154 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 15 लाख 14 हजार 331 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 59 हजार 370 एवढी आहे. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 3 कोटी 93 लाख 39 हजार 817 जणांना लसीकरण करण्यात आले.
गुरुवारी 20,654 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 10 लाख 83 हजार 679 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 2 लाख 71 हजार 282 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
देशात आतापर्यंत 23 कोटी 13 लाख 70 हजार 546 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 10 लाख 57 हजार 383 कोरोना चाचण्या गुरुवारी (दि.18) करण्यात आल्या.