10,000 कोटी रुपये गुंतवणुकीचे ध्येय : मंत्री प्रधान यांची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशामध्ये येणाऱया तीन वर्षांत जवळपास 1 हजार लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. तसेच यासाठी सरकार 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे. तसेच कार्बन उत्सर्जनात घट करण्यासह आगामी काळात ‘एलएनजी’च्या मदतीने परिवहन क्षेत्रात क्रांती घडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे प्रतिपादन पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी केले आहे.
एलएनजीची सेवा कार्यरत करुन लांब पल्ल्यापर्यंत परिवहन सेवा देणाऱया बस आणि ट्रक यांना पसंती दर्शवली जाते. एकावेळी एलएनजी भरल्यानंतर वाहनाची जवळपास 600 ते 800 किलोमीटरपर्यंतचे अंतर पूर्ण करण्याची क्षमता असते. दुसऱया बाजूला 30 ते 40 टक्क्यांनी एलएनजी डिझेलपेक्षा स्वस्त उपलब्ध होत असल्याचे स्पष्ट करून हे परिवहनासाठी फायद्याचे ठरणार आहे. आतापर्यंत वाहन चालविण्यासाठी इंधनाच्या रुपाने पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि ऑटो एलपीजी यांचा वापर करण्यात आलाय.