नवी दिल्ली/प्रतिनिधी
देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. देशात ७४ दिवसानंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. देशात शनिवारी एका दिवसात आणखी ६० हजार ७५३ जणांना करोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या दोन कोटी ९८ लाख २३ हजार ५४६ वर पोहोचली आहे. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या सात लाख ६० हजार ०१९ इतकी असून हा ७४ दिवसांतील नीचांक आहे, असे शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.
करोनामुळे देशात शनिवारी आणखी १६४७ जणांचा मृत्यू झालं;या. यासह देशात एकूण मृतांची संख्या तीन लाख ८५ हजार १३७ वर पोहोचली असून उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एकूण बाधितांच्या २.५५ टक्के इतके आहे.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या२७ कोटी ६६ लाख ९३ हजार ५७२ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.