ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात आतापर्यंत 1 कोटी 09 लाख 25 हजार 710 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 कोटी 06 लाख 33 हजार 025 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आजूनही 1 लाख 36 हजार 872 रुग्ण उपचार घेत आहेत.
देशात मागील 24 तासात 09 हजार 121 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 11 हजार 805 रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल 81 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 55 हजार 813 एवढी आहे. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 87 लाख 20 हजार 822 जणांना लस देण्यात आली आहे.
देशात आतापर्यंत 20 कोटी 73 लाख 32 हजार 298 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 06 लाख 15 हजार 664 कोरोना चाचण्या सोमवारी (दि.15) करण्यात आल्या.