ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात आतापर्यंत 1 कोटी 08 लाख 14 हजार 304 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 कोटी 05 लाख 10 हजार 796 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आजूनही 1 लाख 48 हजार 590 रुग्ण उपचार घेत आहेत.
देशात मागील 24 तासात 11 हजार 713 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 14 हजार 488 रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल 95 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 54 हजार 918 एवढी आहे.
देशात आतापर्यंत 20 कोटी 06 लाख 72 हजार 589 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 07 लाख 40 हजार 794 कोरोना चाचण्या शुक्रवारी (दि.05) करण्यात आल्या.