ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 19.29 लाखांवर
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 61 हजार 919 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 1 कोटी 29 लाख 53 हजार 821 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर अजूनही 19 लाख 29 हजार 329 रुग्ण उपचार घेत आहेत.
दरम्यान, देशात मागील 24 तासात 2 लाख 73 हजार 810 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1 लाख 44 हजार 178 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 1619 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 78 हजार 769 एवढी आहे. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 12 कोटी 38 लाख 52 हजार 566 जणांना लस देण्यात आली आहे.
देशात आतापर्यंत 26 कोटी 78 लाख 94 हजार 549 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 13 लाख 56 हजार 133 कोरोना चाचण्या रविवारी (दि.18) करण्यात आल्या.