ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात आतापर्यंत 1 कोटी 06 लाख 25 हजार 428 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 कोटी 02 लाख 83 हजार 708 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर अजूनही 1 लाख 88 हजार 688 रुग्ण उपचार घेत आहेत.
देशात मागील 24 तासात 14 हजार 545 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 18 हजार 002 रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल 163 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 53 हजार 032 एवढी आहे.
देशात आतापर्यंत 19 कोटी 01 लाख 48 हजार 024 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 08 लाख 242 कोरोना चाचण्या गुरुवारी (दि.21) करण्यात आल्या.