ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 12 हजार 059 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 78 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 08 लाख 26 हजार 363 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 54 हजार 996 एवढी आहे. देशात आतापर्यंत पहिल्या टप्प्यातील 57 लाख 75 हजार 322 लोकांना लस देण्यात आली आहे.
शनिवारी 11,805 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 05 लाख 22 हजार 601 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 1 लाख 48 हजार 766 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
देशात आतापर्यंत 20 कोटी 13 लाख 68 हजार 378 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 06 लाख 95 हजार 789 कोरोना चाचण्या शनिवारी (दि.06) करण्यात आल्या.