ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 13 हजार 193 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 97 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 09 लाख 63 हजार 394 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 56 हजार 111 एवढी आहे. देशात आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 1 कोटी 01 लाख 88 हजार 007 लोकांना लस देण्यात आली आहे.
गुरुवारी 10,896 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 06 लाख 67 हजार 741 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 1 लाख 39 हजार 542 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
देशात आतापर्यंत 20 कोटी 94 लाख 74 हजार 862 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 07 लाख 71 हजार 071 कोरोना चाचण्या गुरुवारी (दि.18) करण्यात आल्या.