ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 13 हजार 203 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 131 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 06 लाख 67 हजार 736 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 53 हजार 470 एवढी आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यातील 16 लाख 15 हजार 504 जणांना लस देण्यात आली आहे.
रविवारी 13,298 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 03 लाख 30 हजार 084 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 1 लाख 84 हजार 182 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
देशात आतापर्यंत 19 कोटी 23 लाख 37 हजार 117 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 05 लाख 70 हजार 246 कोरोना चाचण्या रविवारी (दि.24) करण्यात आल्या.