ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात 2 लाख 71 हजार 202 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, उपचारार्थ रुग्णांची एकूण संख्या 15 लाख 50 हजार 377 एवढी आहे. काल दिवसभरात 1 लाख 38 हजार 331 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 314 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा डेली पॉझिटिव्हीटी रेट 16.28 टक्के आहे.
देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय तसेच सर्वच राज्यांच्या आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून, कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी देशभरात 24 तासांमध्ये आढळलेल्या नवीन कोरोनाबाधितांची संख्या ही अडीच लाखांपेक्षाही जास्त दिसून आली. शनिवारी आढळलेली कोरोनाबाधितांची संख्या ही शुक्रवारच्या तुलनेत 2 हजार 369 रूग्णांनी जास्त आहे.
दरम्यान, देशात ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 7743 एवढी आहे.