ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 15 हजार 144 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 181 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 05 लाख 57 हजार 985 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 52 हजार 274 एवढी आहे.
शनिवारी 17,170 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 01 लाख 96 हजार 885 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 2 लाख 108 हजार 826 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
देशात आतापर्यंत 18 कोटी 65 लाख 44 हजार 868 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 07 लाख 79 हजार 377 कोरोना चाचण्या शनिवारी (दि.16) करण्यात आल्या.