ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 16 हजार 375 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 201 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 03 लाख 56 हजार 845 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 49 हजार 850 एवढी आहे.
सोमवारी 29,091 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 99 लाख 75 हजार 958 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 2 लाख 31 हजार 036 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
देशात आतापर्यंत 17 कोटी 65 लाख 31 हजार 997 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 08 लाख 96 हजार 236 कोरोना चाचण्या सोमवारी (दि.04) करण्यात आल्या.