- सद्यस्थितीत 01 लाख 73 हजार 413 ॲक्टिव्ह रुग्ण
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 17 हजार 407 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 89 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 कोटी 11 लाख 56 हजार 923 वर पोहचली असून, मृतांची संख्या 1 लाख 57 हजार 435 एवढी आहे. आतापर्यंत 1 कोटी 66 लाख 16 हजार 048 जणांना लस देण्यात आली आहे.
बुधवारी दिवसभरात 14,031 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या देशात 01 लाख 73 हजार 413 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 कोटी 08 लाख 26 हजार 075 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत देशात 21 कोटी 91 लाख 78 हजार 908 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 7 लाख 75 हजार 631 कोरोना चाचण्या बुधवारी (दि.3 मार्च 2021) एका दिवसात करण्यात आल्या.