ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना संक्रमणाचा मंदावलेला वेग कायम आहे. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक आहे. शनिवारी 1 लाख 32 हजार 062 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले. तर आतापर्यंत देशातील 2 कोटी 80 लाख 43 हजार 446 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
मृतांची संख्या चिंताजनक
संक्रमणाचा मंदावलेला वेग आणि बरे होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या जरी दिलासादायक असली तर देखील देशातील दैनंदिन कोरोना बळींचा आकडा मात्र चिंता वाढवणारा आहे. मागील 24 तासात देशात 80 हजार 834 नवे संक्रमित रुग्ण आढळले. तर 3303 रुग्णांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत 2 कोटी 94 लाख 39 हजार 989 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 3 लाख 70 हजार 384 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
25 कोटी लोकांचे लसीकरण
आतापर्यंत देशातील 25 कोटी 31 लाख 95 हजार 048 नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.