ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 20 हजार 021 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 279 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 02 लाख 07 हजार 871 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 901 एवढी आहे.
रविवारी 21,131 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 97 लाख 82 हजार 669 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 2 लाख 77 हजार 301 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
देशात आतापर्यंत 16 कोटी 88 लाख 18 हजार 054 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 07 लाख 15 हजार 397 कोरोना चाचण्या रविवारी (दि.27) करण्यात आल्या.